Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

छेना तयार करा

सर्वप्रथम एक लिटर दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यानंतर त्यात थोडे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटल्यानंतर गॅस बंद करा. सुती कापडातून पाणी गाळून घ्या. तयार झालेला छेना थंड पाण्याने धुऊन घ्या.

Chum Chum Recipe

छेना मळून घ्या

आता तयार छेना एका ताटात काढा. हाताने साधारण ८ ते १० मिनिटे छेना चांगला मळून घ्या. छेना मऊ आणि गुळगुळीत झाला पाहिजे. यामुळे चमचम छान मऊ तयार होईल.

chum chum Recipe

चमचमचा आकार तयार करा

मळलेल्या छेन्याचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला हाताने लांबट आकार द्या. चमचमचा आकार दोन्ही बाजूंनी थोडा गोलाकार ठेवा.

chum chum Recipe

साखरेचा पाक तयार करा

एका मोठ्या भांड्यात २ कप साखर आणि ४ कप पाणी घाला. गॅसवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत उकळवा. पाक तयार झाल्यानंतर त्यात चमचमचे गोळे सोडा.

Chum Chum Recipe

चमचम शिजवून घ्या

चमचमचे गोळे साखरेच्या पाकात टाकल्यानंतर झाकण ठेवून साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. चमचम फुलून मोठे होतील. त्यानंतर गॅस बंद करून ते पाकातच थंड होऊ द्या.

Chum Chum Recipe

चमचममध्ये मलाईचे सारण भरा

चमचम थंड झाल्यानंतर त्यांना मधोमध हलकी चीर द्या. त्यात मावा आणि पिठीसाखर एकत्र करून तयार केलेले सारण भरा. यामुळे चमचम अधिक स्वादिष्ट लागतील.

chum chum Recipe

ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा

शेवटी तयार चमचमवर थोडी मलाई किंवा मावा लावा. त्यावर बदाम, पिस्ता आणि नारळाचा किस घालून सजवा. तयार आहेत मऊसूत आणि स्वादिष्ट बंगाली चमचम! थंड करून सर्व्ह करा.

Chum Chum Recipe

Lipstick Cause Cancer: रोज लिपस्टिक लावल्याने खरंच कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Lipstick Cause Cancer | Saam Tv
येथे क्लिक करा