Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Deputy CM Eknath Shinde: आमदार, जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी केलेल्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांचे कान टोचले.

शिंदेसेनेच्या आमदार, जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी पालकमंत्र्यांविरोधात एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर एकनाथ शिंदेंनी पालकमंत्र्यांना खडेबोल सुनावलेत अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. पालकमंत्री पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी नाराजीही व्यक्त केली. पक्ष वाढवणार आहात की संपवणार आहात असा संतप्त सवाल त्यांनी पालकमंत्र्यांना केला. तर कामात लवकर बदल करा हे योग्य नाही, असा इशाराही दिला.

आमदार, जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात प्रयत्न होत नसल्याची तक्रार शिंदेंकडे केली. अनेक पालकमंत्री केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवायची कशी?, असा पदाधिकाऱ्यांचा थेट सवाल करत विविध जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी शिंदेंकडे खंत व्यक्त केली. या तक्रारींनंतर एकनाथ शिंदे संबंधित मंत्र्यांवर संतप्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.