Women dies due to snake bite : नागपंचमीसाठी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू, धाराशिवमधील हृदयद्रावक घटना

Dharashiv News : धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे ही घडली आहे.
 dharashiv
dharashivSaam TV

बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिवमध्ये नागपंचमीच्या दिवशी नवविवाहितेचा सर्पदंशाने (Snake) मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सानिका असं मृत महिलेचं नाव आहे. धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे ही घडली आहे.

 dharashiv
Parbhani News: चारा काढत असतांना हाती आला अजगर; ११ फुटांचा अजगर सर्पमित्राने पकडला

काही महिन्यापूर्वीच सानिकाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पहिलीच नागपंचमी म्हणून सण साजरा करण्यासाठी ती आपल्या माहेरी आली होती. दरम्यान शनिवारी रात्री घरातील सर्व घरासमोरील अंगणात झोपले होते.

तेथेच पहाटे तिला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने घरातील इतर मंडळींना उठवून याबाबत माहिती दिली.  (Maharasthra News)

 dharashiv
Nanded News: नागपंचमीच्या दिवशी नागबर्डीमध्ये भरली नागदेवतेची मोठी यात्रा

सानिकाचा भाऊ आणि वडिलांना तिला तातडीने धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रुग्णालयात तातडीने तिच्यावर उपचार सुर झाले. सकाळी ती सर्वांशी बोलतही होती.  (Latest Marathi News)

मात्र त्यानंतर अचानक तिची प्रकृती ढासळली आणि रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी लातूरमधील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com