CM Eknath Shinde and Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

CM शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला, असा आरोप संजय राऊत यांनी सामनातील आपल्या रोखठोक या सदरात केला होता, यावरूनच आता शिंदेनी राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याबाबत स्वतः संजय राऊत ट्वीट करत माहिती दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला होता. राऊतांनी आरोप केला होता की, एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला.

यावरूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. फौजदारी आणि दिवाणी खटला तुमच्या विरोधात आणि सामना विरोधात दाखल करण्यात येईल, असं या नोटिशीत सांगण्यात आलं आहे.

राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले आहेत की, ''गैरसंवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदेंनी मला कायदेशीर नोटिस पाठवलीय. अतिशय मनोरंजक आणि मजेदार राजकीय नोटीस आहे. अब आयेगा मजा, जय महाराष्ट्र'', असं ते ट्वीट करत म्हणाले आहेत. तसेच ते म्हणाले आहेत की, ''50 खोके एकदम ओके... इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे.''

यावरच आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत म्हणाले की, ''संजय राऊत यांना अशा नोटीस भरपूर येत असतात. परंतु संजय राऊत अशा नोटिशींना घाबरत नाही. महाराष्ट्र आणि पक्षासाठी ते जे काम करत आहेत, त्यापासून ते मागे हटणार नाही.''

राऊतांनी काय केला होता दावा?

1) एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला.

2) प्रत्येक मतदार संघात त्यांनी किमान २५- ३० कोटी रुपये वाटले.

3) पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट.

4) अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: रायगडमधील राजकारण फिरलं, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती; शिंदे सेनेला डावलले

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT