Eknath Shinde
Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

आम्ही ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई : 'न्यायालयात पुरावे लागतात आणि ते सगळं तिथे मांडावे लागतात. ओबीसींचा निर्णय हा किती महत्वाचे आहे ते कोर्टात पटवून दिलं. त्यानंतर आम्ही ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. अखिल धनगर समाजाकडून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळवून दिल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. (Eknath Shinde News )

धनगर समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात करण्यात आलं होतं. या विशेष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अखिल धनगर समाजाकडून ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घोंगडी ढोल देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ढोल देखील वाजवला. यावेळी दादा भुसे, सुहास कांदे, संजय राठोड, संदीपान भुमरे उपस्थित होते.

या मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या ५० आमदारांना सांगितलं की, मी एकटा मुख्यमंत्री नाही, तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात. जे जे भेटत आहेत , ते सगळे मुख्यमंत्री आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन राज्यात हे युतीचे सरकार आणले. पण दुर्दैवाने अडीच वर्षांवपूर्वी असं झालं नाही. म्हणून आता चूक दुरुस्त करू'.

'माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण एक सामान्य माणूस राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे जनतेने पाहिले आहे. दुर्गम भागातून ठाण्यात आलो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या सानिध्यात काम केलं. ते करत मी या राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलो आहे. मला देखील विश्वास बसत नव्हता. मी आधी आधी ३-४ दिवस झोपलो नाही. मोठा कार्यक्रम हातात होता. मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता', असे एकनाथ शिंदे म्हणाले.

'एक एक माणसं जोडली गेली आणि जगात माझं नाव झालं. ते रोज म्हणायचे की सगळे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही जी लढाई लढलो, ती आम्ही जिंकलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. हे शेतकऱ्याचं, मेंढपाळाचं, रिक्षावाल्याचं आणि काम करणाऱ्यां प्रत्येकाचं सरकार आहे. तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्यात मी नक्की हात घालणार आहे.न्यायालयात पुरावे लागतात आणि ते सगळं तिथे मांडावे लागते. ओबीसीचा निर्णय हा किती महत्वाचे आहे ते कोर्टात पटवून दिलं. आम्ही ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला,असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये पुन्हा अपघात; कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू?

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, अनुज थापनच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेतला ताब्यात

SCROLL FOR NEXT