वेळ पडल्यास लोकहितासाठी कायदा बदलण्याचं काम हे सरकार करेल - CM एकनाथ शिंदे

'बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेल्याने अनेक जण समाधान व्यक्त करत आहेत ही भूमिका स्वार्थासाठी नाही.'
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

रुपाली बडवे -

नंदुरबार: वेळ पडली तर लोकहितासाठी कायदा बदलण्याचं काम हे सरकार करेल, तुमचाच भाऊ मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर बसला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे.

आज नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. जिल्ह्यातील त्यांचे राजकीय समर्थक, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आदी २ हजार कार्यकर्त्यांसह होणार प्रवेश करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

Eknath Shinde
'रोहित पवारांचं वक्तव्य बरोबर, देवेंद्र फडणवीस हे तरुण नेते आहेत'

मुख्यमंत्री म्हणाले, 'पावसाच्या काळात तुम्ही ५०० कि.मी. वरून मला पाठिंबा द्यायला आलात, २० तारखेला ऑपरेशन सुरू झाला आणि ३० तारखेला ऑपरेशन सक्सेस झाला. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेल्याने अनेक जण समाधान व्यक्त करत आहेत ही भूमिका स्वार्थासाठी नाही.

आतापर्यंत काही लोकांना वाटत होतं की आम्हीच सर्वोच्च पदावर बसू शकतो. पण, सर्वसामान्य व्यक्ती आता या पदावर आहे. नंदुरबारमधील नगरपालिकांना मी डबल, टिबल, चोबल निधी तुम्हाला देतो. तुमच्या रखडलेल्या सगळ्या योजना सुरू होतील, येणाऱ्या अडीज वर्षात हे सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी हे युतीच सरकार असेल तुम्ही चिंता करू नका.

पाहा व्हिडीओ -

आम्ही तुम्हाला वर ठेवू वेळ पडली तर लोकहितासाठी कायदा बदलण्याचं काम हे सरकार करेल, तुमचाच भाऊ या मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर बसलाय. तुम्हाला न्याय मिळेल शेतकऱ्यांना ५० हजाराच कर्जमाफी केली, इंधनाचे दर कमी केलेत. एक एक टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ नंदुरबारला काही कमी पडणार नाही. चंद्रकांत रघुवंशी यांच्यमागे मी देखील उभा असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com