Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News saam tv
मुंबई/पुणे

Political News: वर्षा बंगल्यावर रंगली महायुतीची खलबतं; शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये मध्यरात्री चर्चा, काय निर्णय झाला?

Maharashtra Breaking News: राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक उरला असताना वर्षा बंगल्यावर मंगळवारी (१३ फेब्रुवारी) मध्यरात्री महायुतीची खलबतं झाली.

Satish Daud

Maharashtra Political News

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक उरला असताना वर्षा बंगल्यावर मंगळवारी (१३ फेब्रुवारी) मध्यरात्री महायुतीची खलबतं झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारांमध्ये तब्बल अडीज तास चर्चा झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागा असून सर्वच जागांवर महायुतीने उमेदवार उतरवण्याचा प्लॅन आखल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आज म्हणजेच बुधवारी महायुतीकडून उमेदवाराची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या भाजपमधील एन्ट्रीनंतर राज्यसभेचं गणित बदललं आहे. भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची तयारी करत आहे. (Latest Marathi News)

याशिवाय अजित पवार गट आणि शिंदे गट प्रत्येकी १ जागेवर उमेदवार उतरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. महायुतीच्या या गणितामुळे महाविकास आघाडीला राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. आज महायुतीच्या उमेदवाराची यादी समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात राज्यसभा मताचं गणित काय?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे.

२८४ आमदार राहिल्याने मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ४०.५७ इतका आहे. भाजपकडे १०४ आणि अन्य १३ अपक्ष आमदारांची मतं आहेत. त्यानुसार भाजपच्या ३ जागा सहजपणे निवडून येऊ शकतात.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडे प्रत्येकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचाही १-१ उमेदवार निवडून येऊ शकतो. सरीकडे काँग्रेसकडे ४५ आमदारांचं संख्याबळ असल्याने त्यांची एक जागा निवडून येऊ शकतो. त्यांना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचा पाठिंबा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Raksha Bandhan 2025: शास्त्रानुसार राखी कोणत्या हाताला बांधावी?

HBD Kiara Advani : सुंदर दिसण्यासाठी कियारा अडवाणी लावते 'हा' फेसपॅक, फक्त ५ रूपयांत घरीच होतो तयार

Bank Loan Recovery : 'आधी पैसे दे, नंतर बायकोला घेऊन जा', कर्जाचे पैसे न दिल्याने बँकेने महिलेला नेलं उचलून

Murud-Janjira To Vasai Fort: मुरुड जंजिरा किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत जायचंय? वाचा सर्वोत्तम वाहतुकीचे पर्याय

SCROLL FOR NEXT