Eknath Shinde  Saam tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde Speech : तुमच्या लाडक्या भावाला तुरुंगात टाकलेलं चालेल का? CM एकनाथ शिंदे यांचा सवाल

Eknath Shinde speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीवर तोफ डागली.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील सभेतून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. पहिल्याच जाहीर प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीवर टीका केली. 'तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं चालेल का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी जनतेला केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर सभा कुर्ला येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील सभेपासून प्रचार सभेचा नारळ वाढवला आहे. त्यांनी कुर्ला येथे हिंदी भाषेतून जनतेला संबोधित केलं.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

मी लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचं स्वागत करतो. ओपनिंग बॅट्समॅन हे मंगेश कुडाळकर झाले आहेत. आता चौकार आणि सिक्सर मारायचा आहे. समोरच्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहेत.

यावेळी मंगेश कुडाळकरांना ५० हजार मताधिक्याने निवडून आणायचं आहे. काही ठिकाणी लवंग्या आहेत, पण आपला २३ तारखेला अँटम बॉम्ब फुटणार आहेत. महायुतीच्या सभा होतील. सगळे लोक अनेक ठिकाणी प्रचार करत आहेत. आज माझ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो.

आता वर्षाला भाऊबीज नाही दर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. माहेरचा आहेर मिळणार आहे. ज्यांच्या खात्यात गेले नाही, त्यांच्या खात्यात येणार हा शब्द द्यायला आलोय.

विरोधक बोलतात की ही योजना बंद करणार. तुम्ही खोडा टाकणाऱ्यांना जोडा दाखवणार की नाही? योजनेच्या विरोधात हायकोर्टात पण गेले. पण कोर्टाने चपराक मारली. आता बोलतात की आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार. बोलतात की चौकशी लावणार जेलमध्ये टाकणार.

तुम्हाला तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं चालेल? मी पैसे दिले म्हणून मी गुन्हेगार, तर मी असे गुन्हे अनेक वेळा करायला तयार आहे. विरोधकांचा चुनावी जुमला असतो. पण आम्ही असं कधी करणार नाही.

आम्ही लोकांना फसवणार नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो. फेसबुक लाईव्ह करुन काम करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Date Ice Cream : घरच्या घरी बनवा टेस्टी खजूर आईसक्रीम, लहान मुलं आवडीने खातील, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Budget 2026: जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

Married Tips: बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला का झोपते?

SCROLL FOR NEXT