मुंबई महापालिकेची सत्ता मिळताच मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये
मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याची घोषणा
एकाही मराठी माणसाला मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, ठाम आश्वासन
मुंबईकरांनी भरघोस मत देत मुंबई महापालिकेच्या सत्तेत आणलं, त्या मुंबई आणि मराठी माणसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मोठे निर्णय घेतलेत. मुंबई शहराला देशातील नाही तर जगातील उत्तम शहर म्हणून प्रस्थापित करणार. तसेच मुंबईतून एकाही मराठी माणसाला बाहेर जाऊ देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. भाजपचे उमदेवार मुंबईतल्या झोपडपट्टीतही व आणि हायफाय सोसायटीमधून निवडून आलेत, त्यामुळे भाजप झोपडपट्टीतील लोकांना घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद फडणवीसांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नगरसेवकांचे आणि भाजपच्या नेत्यांचे अभिनंदन केलं. यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला मारला. जे मराठी माणसाला आपली जहागीर समजत होते, त्यांना हे लक्षात आलं की मुंबईचा मराठी माणूस हा विकासासोबत आहे. भाजपसोबत आहे.
त्यामुळे मुंबईच्या मराठी माणसांनी आम्हाला मतदान केल्याचं फडणवीस म्हणाले. कुठलाही एरिया तुम्ही बघा, सगळ्या भागात भारतीय जनता पक्षाला मतं मिळालेली आहेत. सगळ्या समाजाने भारतीय जनता पक्षाला मतं दिले आहेत. भाषेच्या पलीकडे जातीच्या पलीकडे जात प्रत्येक समाज हा भाजपच्या सोबत उभा राहिल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या. महपौर आपल्या खुर्चीवर विराजमान होताच आम्ही कामाला लागू. पहिल्या दोन वर्षात जे कामे हाती घेतली आहेत ते पूर्ण करू, असं फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.