Atal Setu Toll Free: अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना वर्षभर टोल फ्री; महापालिकेची निवडणूक होताच सरकारचा मोठा निर्णय

Atal Setu Toll Free: महाराष्ट्र सरकारने अटल सेतूबाबत मोठा निर्णय घेतलाय. सरकारने एका वर्षासाठी टोल-मुक्त प्रवासाची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Atal Setu Toll Free:
Vehicles plying on the Atal Bihari Vajpayee Shivdi–Nhava Sheva Atal Setu connecting Mumbai and Navi Mumbai.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीनंतर सरकारचा मोठा निर्णय

  • अटल सेतूवर पुढील एक वर्ष टोल फ्री प्रवास

  • मुंबई–नवी मुंबई प्रवाशांना मोठा दिलासा

महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागताच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत दिलीय. म्हणजेच काय अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना वर्षभर टोल फ्री प्रवास करता येणार आहे. मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरता टोल फीमध्ये ५०टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय. या पुलावरून ६०,००० वाहने धावतात.

Atal Setu Toll Free:
'देवा'च्या मनात असेल तर तेही होईल; मुंबई महापौरपदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य,चर्चांना उधाण

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

Atal Setu Toll Free:
BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

असे असतील दर

वाहनांचा प्रकार शिवडी ते गव्हाण शिवडी आणि ते शिवाजीनगर शिवाजी नगर ते गव्हाण

१) मोटर, जीप- २५० रु.

व्हँन- २०० रू.

हलके मोटार वाहन -५० रू

२) हलके व्यावसायिक वाहन- ४००

हलके मालवाहू वाहन- ३२०

मिनी बस - ८०

३) ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)- ८३०,६५५, १७० रुपये.

४) तीन आसांचे व्यावसायिक वाहनासाठी - ९०५, ७१५, १८५ रुपये.

५) अवजड बांधकाम यंत्रसामग्री - १३००

जमीन खोदाई यंत्रसामग्री - १०३०

अधिक आसांचे वाहन -२७०

६)अति अवजड वाहन - १५००

सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन- १२५५ आणि ३२५ रुपये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com