Devendra Fadnavis news  Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Maratha Reservation Update : मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय घडतंय, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक

CM देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष

मुंबई : मनोज जरांगे यांचं गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी राज्यभरातून आंदोलक आझाद मैदानात पोहोचले आहेत. या सर्व मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ वर्षावर पोहोचले आहेत. मराठा आरक्षण उपसमिती आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळण्यामागे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जुने निकाल कारणीभूत ठरले. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या जुन्या निर्णयामुळे मराठा आरक्षण उपसमिती पेचात सापडली. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमिती आणि महाधिवक्त्यांशी बैठक झाली. मराठा आरक्षण उपसमिती आणि महाधिवक्त्यांशी जवळपास ५० मिनिटं चर्चा झाली.

या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या महत्वाच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT