Pune Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Pune Shocking News : पुण्यात नवजात बाळाला गाईचे दूध दिल्यामुळे गंभीर जंतुसंसर्ग झाला. या बाळावर कमला नेहरू येथील रुग्णालयात उपचार सुरु होते अखेर डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले.

Alisha Khedekar

  • पुण्यात २५ दिवसाच्या बाळाला गाईचे दूध दिल्याने गंभीर इन्फेक्शन झाले.

  • बाळाची प्रकृती अतिशय नाजूक झाली व तो व्हेंटिलेटरवर ठेवावा लागला.

  • कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी एक महिना उपचार करून बाळाला वाचवले.

  • या प्रकरणातून नवजात बाळासाठी आईचे दूधच सुरक्षित असल्याचे अधोरेखित झाले आहे.

तुम्हीसुद्धा नवजात बाळाला गायीचे दूध देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नवजात बाळासाठी पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच पोषक आणि सुरक्षित मानले जाते, मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यातील एका बाळाला जीवघेणा त्रास सहन करावा लागला. २५ दिवसाच्या बाळाला गाईचे दूध दिल्याने त्याला गंभीर प्रकारचा जंतुसंसर्ग झाला. बाळाची प्रकृती इतकी नाजूक झाली की त्याला कमला नेहरू रुग्णालयात एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला अखेर जीवनदान मिळाले असून, त्याला आता घरी सोडण्यात आले आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका महिलेची काही दिवसांपूर्वी प्रसूती झाली आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. सुरुवातीला आई आणि बाळ दोघांची तब्येत ठणठणीत होती. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. मात्र आईचे दूध येत नसल्यामुळे घरच्यांनी बाळाला गाईचे दूध देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच बाळाच्या शरीरात गंभीर इन्फेक्शन झाले. बाळाला १७ जून रोजी कमला नेहरू रुग्णालयात जुलाब आणि अशक्तपणामुळे दाखल करण्यात आले.

एनआयसीयूमध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना लक्षात आले की बाळाच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे, रक्तदाब घटलेला आहे, मेटॅबोलिक अ‍ॅसिडोसिस झाला आहे आणि श्वास घेण्यास त्रास होतो आहे. जन्मावेळी ३.४ किलो वजन असलेले हे बाळ, इन्फेक्शनमुळे केवळ २.८ किलोवर आले होते. डॉक्टरांनी तातडीने बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले. औषधोपचार सुरू करण्यात आले आणि रक्तदाबासाठी इंजेक्शन दिले गेले.

बालरोगतज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितले की, बाळाला नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस (NEC) म्हणजेच आतड्यांना सूज आली होती. त्यामुळे पोट फुगले होते आणि आतडे फुटण्याची शक्यता होती. बाळाला दिलेल्या औषधांना सुरूवातीला प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून अधिक प्रभावी औषधे वापरण्यात आली. याशिवाय बाळाला पाच वेळा रक्त चढवण्यात आले. आठ दिवस बाळाला अन्न न देता केवळ नसेद्वारे प्रथिनयुक्त अमिनोवेन दिले गेले, ज्यामुळे त्याच्या शरीरावरील सूज कमी होण्यास मदत झाली.

सुमारे दहा दिवस बाळ व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सपोर्टवर होता. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली आणि ३६ दिवसांचे होईपर्यंत बाळ दुध पचवू लागले. अखेर २१ दिवसांच्या एनआयसीयू उपचारांनंतर, ४६ दिवसांचे झाल्यावर बाळाला घरी सोडण्यात आले. कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांनी सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रुग्णालयात दररोज ८०० ते १००० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. दररोज २० ते २५ प्रसूती रुग्णालयात होतात आणि अनेक नवजात बाळांना एनआयसीयू सुविधा दिल्या जातात.

नुकत्याच या प्रकरणात गाईचे दूध दिल्याने बाळाला जंतुसंसर्ग झाला होता, परंतु आमच्या डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून त्याला जीवनदान दिले. दरम्यान या प्रकरणावरून हे सिद्ध झाले की नवजात बाळासाठी पहिल्या सहा महिन्यांत आईचे दूधच सर्वोत्कृष्ट असते. त्याऐवजी दिलेले गाईचे किंवा कोणतेही बाह्य दूध बाळाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बाळाच्या आहारात बदल करावा.

बाळाला गाईचे दूध दिल्यामुळे नेमका काय त्रास झाला?

बाळाला जंतुसंसर्ग (NEC) होऊन पोट फुगले आणि त्याची प्रकृती अतिशय नाजूक झाली.

बाळावर कोणत्या पद्धतीने उपचार करण्यात आले?

बाळाला व्हेंटिलेटर सपोर्ट, अँटीबायोटिक्स, प्रथिनयुक्त द्रव, आणि पाच वेळा रक्त चढवण्यात आले.

डॉक्टरांनी बाळाला किती दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले?

सुमारे १० दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होता आणि २१ दिवस NICU मध्ये उपचार करण्यात आले.

या घटनेतून पालकांनी काय शिकायला हवे?

सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूधच देणे गरजेचे आहे. कोणतेही बाह्य दूध जीवघेणे ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT