Shreya Maskar
चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील किनारी भागात बसला. त्यामुळे समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला. ज्यामुळे ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद करण्यात आला होता.
जंजिरा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता शिडाच्या आणि इंजिन बोटी समुद्रात उतरवल्या गेल्या नाहीत आणि जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद केले गेले.
आता मात्र रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जलदुर्ग मुरुड जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. गेली काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन किल्ल्यावर पर्यटकांचा प्रवेश बंद होता.
मात्र आता नऊ दिवसांनंतर महाराष्ट्रातील वातावरण मोठा बदल झाला आहे. समुद्र शांत झाला असल्यामुळे जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या होड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहे. त्यामुळे जंजिरा किल्ला पुन्हा पर्यटनासाठी खुला झाला आहे.
जंजिरा किल्ला समुद्राच्या मधोमध असूनही त्यात गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. हे किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्ये आहे. हिवाळ्यात जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, त्यामुळे शत्रूंना किल्ल्याच्या जवळ येणे कठीण होते. जंजिरा किल्ल्याचे इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. जंजिरा किल्ला अरबी समुद्रात एका बेटावर असलेला एक अभेद्य जलदुर्ग आहे. जंजिरा किल्ल्याची तटबंदी आजही खूप मजबूत आहे.
जंजिरा किल्ल्यावर 'कलाल बांगडी' नावाची एक मोठी आणि प्रसिद्ध तोफ आहे. किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहेत. लहान मुलांसोबत येथे ट्रिपला नक्की जा.
जंजिरा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. मुरुड-जंजिरा किल्ल्याला 'अजिंक्य किल्ला' म्हणूनच ओळखले जाते.