Shreya Maskar
तुंगार्ली तलाव लोणावळ्यातील एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तुम्हाला येथे भन्नाट फोटोशूट करता येते.
तुंगार्ली तलाव सह्याद्री पर्वतरांगांच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखले जाते. निसर्गप्रेमींनी येथे आवर्जून भेट द्या.
तुंगार्ली तलावाला भेट दिल्यावर तेथे शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येते. त्यामुळे तुम्ही येथे वन डे पिकनिक प्लान नक्कीच करू शकता.
तुंगार्ली तलाव लोणावळ्याजवळ डोंगरमाथ्यावर आहे. हा लोणावळा शहरासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
लोणावळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने तुंगार्ली धरणाची निर्मिती केली होती. तुंगार्ली धरण हे केवळ गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने लोणावळ्याला पाणीपुरवठा करणारे एकमेव धरण आहे.
लोणावळ्यातील तुंगार्ली तलावाकडे जाण्यासाठी डोंगर चढून जावे लागते. तुंगार्ली तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही तुंगार्ली तलावाला आवर्जून भेट द्या. या काळात येथे थंड वातावरण येथे अनुभवता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.