Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून वीकेंडला पुण्यात ट्रिप प्लान करा. येथे तुम्हाला कुटुंबासोबत निवांत वेळ घालवता येईल. लोकेशन आताच नोट करा.
पुण्यातील जुन्नर येथे निमगिरी आणि हनुमंतगड हे जुळे किल्ले आहेत. जे एकाच टेकडीवर दोन शिखरे म्हणून आहेत आणि एका लहान खिंडीने वेगळे झाले आहेत.
निमगिरी किल्ला व्यापारी मार्गाचे रक्षण करणार्यासाठी महत्त्वाचा होता. या किल्ल्याचे इतिहासात मोठे स्थान आहे.
कातळात खोदलेल्या पायऱ्या निमगिरी किल्ल्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येथे चालताना एक वेगळीच मजा येते.
निमगिरी-हनुमंतगड किल्ल्याने मध्ययुगीन काळात नाणेघाट मार्गे जुन्नर ते कल्याण बंदर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण केले.
निमगिरी किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि गुहा आहेत. असे बोले जाते.
पुरंदर आणि वज्रगड यांनाही जुळे किल्ले म्हटले जाते. कारण ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि एकाच डोंगराच्या रांगेत आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.