Shreya Maskar
काशीद बीच हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील, अलिबाग आणि मुरुड यांच्या दरम्यान अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.
काशीद बीच पांढरी शुभ्र वाळू, निळाशार समुद्र आणि हिरवीगार वातावरण यासाठी ओळखला जातो.
काशीद बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त पॅरासेलिंग, बनाना बोट राइड , बंपर राइड या जलक्रीडांचाही अनुभव घेऊ शकता.
काशीद बीचजवळ मुरुड जंजिरा किल्ला आणि फणसाड अभयारण्य यांसारखी पर्यटन स्थळे आहेत.
तुम्हाला प्राणी, पक्षी, रंगीबेरंगी फुले यांची आवड असेल तर फणसाड अभयारण्याला भेट द्या.
अनेक पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देताना काशीद बीचवर थांबतात, कारण हे दोन्ही ठिकाण जवळ आहेत.
काशिद बीचला 'मिनी गोवा' म्हणून ओळखले जाते. तुम्ही येथे समुद्रकिनारी भन्नाट फोटोशूट करू शकता.
काशीद बीचला जाण्यासाठी मुंबई आणि पुणे येथून बाय रोड जाऊ शकता.