Shreya Maskar
सातारा जिल्ह्यात 'कास तलाव' आहे, जो कास पठाराजवळ आहे. ही दोन्ही ठिकाणे त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखली जातात.
कास तलाव शांत, स्वच्छ ठिकाण आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. जोडीदारासोबत येथे आवर्जून जा.
कास तलावाच्या परिसरात घनदाट वनराई पाहायला मिळते. पावसाळ्यात, हिवाळ्यात दाट धुक्याची चादर दिसते.
कास तलाव हिरव्या टेकड्यांनी वेढलेले आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रिप प्लान करा. कास तलावात मनसोक्त बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
कास पठारावर रंगीबेरंगी फुलांचा सडा पाहायला मिळतो. पठार विविध रानफुलांनी नटून जाते आणि तेथील दृश्य मंत्रमुग्ध करणारे असते.
कास पठार औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे . येथे ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये आवर्जून भेट द्या.
साताऱ्याला गेल्यावर कोयना वन्यजीव अभयारण्याला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.