Gold Seized Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबई एअरपोर्टवरून ७.४४ कोटी रुपयांचं सोनं जप्त, ७ जणांना अटक

Gold Seized At Mumbai Airport: कस्टम विभागाने ११ किलोंपेक्षा जास्त वजनाचे सोनं जप्त केले आहे. या सोन्याची किंमत अंदाजे ७ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर (Mumbai International Airport) कस्टम विभागाने (Custom Department) मोठी कारवाई केली आहे. विचित्र पद्धतीने सोन्याची तस्करी करणाऱ्यांना कस्टम विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. कस्टम विभागाने ११ किलोंपेक्षा जास्त वजनाचे सोनं जप्त केले आहे. या सोन्याची किंमत अंदाजे ७ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई कस्टम विभागाने मोठी कारवाई करत आज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून ७.४४ कोटी रुपयांचे सोनं जप्त केले. एकूण १८ केसेसमध्ये ११.६२ किलो सोन जप्त करण्यात आले आहे. सोन्याचे दागिने, विटा, सोन्याची पूड , सोन्याचं मेण स्वरूपात सोन्याची तस्करी केली जात होती. गुदद्वार तसेच अंतर्वस्त्र, कपडे आणि बुटात लपवून सोन्याची तस्करी केली जात होती. याप्रकरणी कस्टम विभागाने परदेशी नागरिकांसह एकूण ७ प्रवाश्यांना अटक केली. या सर्व आरोपींकडून कस्टम विभागाने १२ लाख रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे.

मागच्या महिन्यात १२ एप्रिल रोजी देखील कस्टम विभागाने मुंबई एअरपोर्टवर मोठी कारवाई करत सोन्याची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. कस्टम विभागाने ४.६९ कोटी रुपयांचे तब्बल ८ किलो वजनाचे सोनं जप्त केले होते. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींनी देखील अंतरवस्त्रात, गुदद्वारात लपवून सोनं आणलं होतं. कस्टम विभागाने सोन्याचं मेण, रोडियम प्लेटेड वायर आणि बक्कल तसेच वॉशरच्या आकाराच्या रिंग या स्वरुपात तस्करी करण्यात येत असलेले सोनं जप्त केले आहे.

दरम्यान, ८ एप्रिल रोजी देखील कस्टम विभागाने मुंबई एअरपोर्टवर मोठी कारवाई केली होती. एकूण ८ कारवाईतून तब्बल ८.१० किलो वजनाचे सोनं कस्टम विभागाने जप्त केले होते. या सोन्याची किंमत अंदाजे ४.८१ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. गुदद्वार तसंच अंतरवस्त्रामध्ये लपवून या सोन्याची तस्करी केली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

SCROLL FOR NEXT