Mumbai News : डॉक्टरांच्या जिद्दीला सलाम! गंभीर अपघातग्रस्त तरुणाचे शस्त्रक्रिया न करता वाचवले प्राण

Mumbai doctor treatment : मुंबईतील फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता या रूग्णाचे यकृत व फुफ्फुस वाचवले आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam tv

मुंबई : मुंबईतील फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता या रूग्णाचे यकृत व फुफ्फुस वाचवले आहे. झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्या नेतृत्वाखाली अन्य एक डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत यशस्वी उपचार करुन रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले आहे.

घाटकोपरमधील तरुणासोबत नेमकं काय झालं होतं?

मुंबईच्या घाटकोपरमधील प्रशांत कदम हा एका खासगी कंपनीत कामाला आहेत. १५ एप्रिल रोजी त्यांचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या लिव्हरला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांच्या शरीराच्या आत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे या फुफ्फुसाला इजा पोहोचली होती. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयात दाखल केलं. या रुग्णालयात जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. अशा स्थितीत अशा स्थितीत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता प्रशांत यांचे लिव्हर वाचवले आहे.

Mumbai News
Fake doctor in Mumbai : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर; रुग्णांना द्यायचा रुग्णांना इंजेक्शन आणि सलाइन

घाटकोपरमधील तरुणासोबत नेमकं काय झालं होतं?

मुंबईच्या घाटकोपरमधील प्रशांत कदम हा एका खासगी कंपनीत कामाला आहेत. १५ एप्रिल रोजी त्यांचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या लिव्हरला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांच्या शरीराच्या आत रक्तस्त्राव झाला.

रुग्णाच्या फुफ्फुसाला इजा पोहोचली होती. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयात दाखल केलं. या रुग्णालयात जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. अशा स्थितीत अशा स्थितीत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता प्रशांत यांचे लिव्हर वाचवले आहे.

Mumbai News
Drunken Doctor: छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयातच झाला निर्वस्त्र

सर्जन डॉ. हेमंत पटेल काय म्हणाले?

याबाबत जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, अपघातानंतर रूग्णाला उपचारासाठी आणलं. त्याचं सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. हेमोथोरॅक्स आणि उजव्या लिव्हर लोबच्या ५०-७५% इजा झाली होती. त्यामुळे नाकातील ऑक्सिजन, इंट्राव्हेनस अँटिबायोटिक्स, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, नेफ्रो प्रोटेक्टिव्ह आणि हेपॅटो प्रोटेक्टीव्ह औषध दिलं. रुग्णाला स्थिर केलं. त्यानंतर हेमोथोरॅक्स काढून टाकण्यात आले. 12 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. या उपचारामुळे रुग्णाची पोटदुखी पूर्णपणे थांबली होती. आता मुंबईतील हा रुग्ण त्याची सर्व दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे करु लागला आहे'.

डिस्क्लेमर : रुग्णालयात प्रत्येक रुग्णाची स्थिती ही वेगवेगळी असते. त्यामुळे साम टीव्ही कोणत्याही रुग्णालयातील रुग्णावरील उपाचाराच्या प्रभावीपणाची हमी देत ​​नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com