Mumbai Rain News: मुंबईत १५ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात काय परिस्थिती?

Mumbai and Other Maharashtra Regions Weather Forcast: मुंबईत १५ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Mumbai Rain News: मुंबईत १५ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात काय परिस्थिती?
Maharashtra Weather Forcast: Chance Of Unseasonal Rain In Mumbai Till May 15, Check the Weather forecast for Other Regions in Maharashtra Like Vidarbha, MarathwadaSaam TV
Published On

गिरीश कांबळे, मुंबई

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला खरा पण शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. अशामध्ये आता हवामान खात्याने (Weather Department) मुंबईत १५ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai Rain News: मुंबईत १५ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात काय परिस्थिती?
Mumbai News : ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर गेला, ३०० फूट खोल दरीत कोसळला; २२ तासांचा थरार

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या पाच दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई वेदर या स्थानिक हवामान ब्लॉगरच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे येतील. मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकणात जोरदार वादळी वारे वाहतील. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मध्यम पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडले. तर मुंबईतही तुरळक पाऊस पडेल.

हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी नुकताच एक्स अकाऊंटवर हवामानासंदर्भात पोस्ट शेअर केली आही. त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले की, 'मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.' दरम्यान, पुढील २ ते ३ दिवसांत लोकसभेसाठी प्रचाराला वेग येणार आहे. मात्र याच वेळेत पाऊस पडल्यास राजकीय पक्षांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain News: मुंबईत १५ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात काय परिस्थिती?
Mumbai Tragedy: IIT ग्रॅज्युएट तरुणानं संपवलं जीवन; त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com