कपिल कसबे नावाचा तरूण त्याच्या मित्रासोबत पाच दिवस ट्रेकिंग करण्यासाठी माहुली किल्ल्यावर गेला होता. ८ मे रोजी तो समुद्रसपाटीपासून २ हजार ८१५ फूट उंचीवर असताना घसरला आणि थेट दरीत कोसळला. परंतु, एक अनुभवी ट्रेकर असल्यामुळे त्याने झाडे आणि खडकांना पकडलं. शेवटी ३०० फूट खाली असलेल्या जागेवर तो (Mumbai News) उतरला होता.
सुदैवाने कसबे याच्याकडे फोन होता. त्यामुळे तो शाहपूर पोलिसांना फोन करून झालेली घटना कळवू शकला. पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ सुसज्ज आणि प्रशिक्षित ट्रेकर्स असलेल्या गावकऱ्यांचा समावेश (Trekker Rescue Operation) असलेल्या एका स्थानिक बचाव पथकाला घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस, वनविभाग आणि गावकऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने बचाव कार्य सुरू केले.
हा तरूण जखमी असल्यामुळे (Trekker Fell In Valley) त्याला वर खेचण्याचं काम अवघड होतं, असं समीर चौधरी नावाच्या बचावकर्त्याने म्हटलं आहे. रस्ताही निसरडा होता. त्या तरूणाला वाचवण्याचे आणि आमच्या टीममधील सदस्यांच्या सुरक्षेचं आव्हान समोर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरीची खोली आणि या तरूणाचं ठिकाण शोधण्यात बचाव पथकाला अखेर यश मिळालं होत. परंतु तोपर्यंत अंधार झाला होता. चौधरी यांनी सांगितलं की, टीमने त्यांना मदत करण्यासाठी लोणावळ्यातील (Mahuli Fort) रॉक क्लाइंबिंग तज्ञ गणेश गीध यांना बोलावण्याचा निर्णय घेतला होता. एक बकेट स्ट्रेचर आवश्यक असल्यामुळे बचावकार्य सकाळच्या वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पथकाने पुन्हा बचावकार्य सुरू केलं. या तरूणाला झिप लाइन आणि रॅपलिंग तंत्राचा वापर करून चार टप्प्यांत खेचण्यात आलं. दरीत कोसळल्यानंतर सुमारे २२ तासांनी या तरूणाला वाचविण्यात बचाव पथकाला यश आलं. परंतु या अपघातात तरूणाचा पाय तुटला आहे. वर खेचल्यानंतर या तरूणाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.