Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Latest News : 1 जानेवारीला पुण्यातील 'हा' रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार, वाहतूक पोलिसांनी दिले पर्यायी मार्ग

Pune Traffic Police : नववर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी रोजी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रोड बंद राहणार आहे. नववर्षानिमित्त शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

नववर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणारा मार्गदेखील वाहनांसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असं वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई

सरत्या वर्षाला निरोप देताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील मुख्य चौकात आणि मुख्य रस्त्यांलगत पोलिसांचे पथक तैनात राहणार आहेत.

रस्त्यावर मध्यरात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. अपघात टाळण्यासाठी अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT