Mumbai Crime News : मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Threatening phone call to Mumbai police : शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam TV
Published On

Mumbai News :

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचे सांगत एका कॉलरने केला. एक वाक्य बोलून कॉलरने लगेचच फोन कट केला.

शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. प्राथमिक तपासात फोन जे बी नगर एअरपोर्ट रेसिडन्सी कॉम्पलेक्समधून फोनचे लोकशन समजले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Police
Chandrakant Patil: 'मराठा आरक्षणाला १ वर्ष लागू शकते...' मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्वात मोठे विधान

मुंबई पोलिसांनी सांगितले...

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मुंबई पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला होता. व्यक्तीने फोनवर सांगितले की, मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत आणि त्याने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी फोन कॉलच्या आधारे अनेक ठिकाणी तपास केला, मात्र अद्यापपर्यंत संशयिताचा काहीही पत्ता लागलेला नाही.

Mumbai Police
Thane Crime News : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, जवळपास 100 तरुण ताब्यात; पार्टीत नेमकं काय सुरु होतं?

गेल्या महिन्यात विमानतळ उडवून देण्याची धमकी

याआधीही मुंबईत दहशत माजवण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या महिन्यात 23 नोव्हेंबरला मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ई-मेलद्वारे मिळालेल्या धमकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करण्यात येईल, असे लिहिले होते.

नुकतीच आरबीआयलादेखील धमकी मिळाली होती. ईमेलद्वारे मिळालेल्या या धमकीमध्ये एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com