नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांचा मंदिरांमध्ये रीघ लागली आहे. भाविकांचा गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी शिर्डी साईबाबा आणि सप्तश्रृंगी मंदिर प्रशानसनाने मंदिरे २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना दिवसा आणि रात्रीदेखील दर्शन घेता येणार आहे.
सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज ३१ डिसेंबरला रविवार असल्याने भाविकांची गर्दी अडीचपट वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्टने मंदिर २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीदेखील सज्ज झाली आहे. आज साईमंदिर रात्रभर खुले राहणार आहे. साईदर्शन घेऊन नववर्षाची सुरूवात करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल आहेत. आज मध्यरात्रीही साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.