Uddhav Thackeray On BJP Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: स्वराज्यासाठी महाराजांनी सुरत लुटली, हे दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On BJP : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

Satish Kengar

''छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. आता हे दोन ठग छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटत आहेत'', अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केली. मुंबईत आज दादर येथील शिवाजी मंदिर येथे राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद पार पडली. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालतात आणि संविधान बदलतात. संविधान बदलण्याचा घाट बांधला जातोय. त्यामुळे मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्तांनो, अशी केली. त्यावर टीका करण्यात आली. देशभक्त म्हटल्यानंतर सर्वजण येतात. हिंदू, मुस्लीम, सर्वजण येतात. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जे जे सोबत येतात. ते ते आपल्याला हवेत.''

ते म्हणाले, ''महाराष्ट्र नवा घडवण्याची गरज नाही, जे आहे ते टिकवलं तर महाराष्ट्र इतरांच्या खूप पुढे आहे. कोणतेही क्षेत्र घ्या.. सर्व क्षेत्रात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. काय म्हणून त्या दोघांचं ऐकायचं. दुर्देवं म्हणून तुम्ही तिकडे बसलात, ते आमचेच पाप आहे. तुम्ही आहात कोण? लोकशाही का संपवायची आहे? लोकशाही संपवण्याची भाषा करतात. पावले टाकतात.''

ठाकरे म्हणाले, ''काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे, मी त्यांना पाठिंबा देईन. मला पुन्हा येईन असे कधी वाटलेच नाही. दोन ठागांच्य गुलामगिरीला आम्ही स्वीकारणार नाही . हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. पण काळानुसार भूमिका घ्यावी लागते. मला शेंडी जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नको हे माझे वाक्य नाही बाळासाहेबांचे आहे.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''बुरसटलेले हिंदुत्व मान्य नाही. हेही बाळासाहेबांचे वाक्य आहे. जो लढा माझ्या आजोबांनी दिला, तोच वडिलांनी दिला. लोकांची घरे पेटवणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, तर चूल पेटवणारे हिंदुत्व हवेय. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT