Maharashtra Politics: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray on Maharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. आज मुंबईत एका कार्यक्रमात त्यांनी भाजप जणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray Saam Tv
Published On

''काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे, मी त्यांना पाठिंबा देईन. मला पुन्हा येईन, असे कधी वाटलेच नाही'', असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत आज दादर येथील शिवाजी मंदिर येथे राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद पार पडली. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''दोन ठागांच्या गुलामगिरीला आम्ही स्वीकारणार नाही. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. पण काळानुसार भूमिका घ्यावी लागते. मला शेंडी जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नको, हे माझे वाक्य नाही बाळासाहेबांचे आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Haryana Election Result : हरियाणात काँग्रेसला झटका, महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

ते म्हणाले आहेत की, ''लोकसभेत करून दाखवलं.लोकसभेच्या निमित्ताने देशात वातावरण दिसलं की, दिल्लीतले सरकार संविधान बदलायला निघाले. फेक नॅरेटिव्ह सारखा शब्द त्यांचा आहे. काश्मीर, हरियाणा निकाल लागले. जनतेला आपला अनुभव आला, त्यांनी जागरूकपणे निर्णय घेतला.''

गुजराती आणि मराठी वादावर काय म्हणाले?

गुजराती आणि मराठी वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''गुजराती आणि मराठी हा वाद होतोय. तो होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग असे तिथे बसले आहेत... त्यांनी फक्त मुंबई नाही तर संपूर्ण देश आणि गुजरात यांच्यामध्ये भींत बांधली.''

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Jammu and Kashmir CM Face : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला दणका, काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार; मुख्यमंत्र्यांचं नावही ठरलं

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ''अयोध्या आणि वारणसीमध्ये का हरले? जिथे राम मंदिर बांधण्यात आलं, तिथे का पराभव झाला. तिथे हिंदू नाहीत का? सर्व कॉन्ट्रॅक्टर गुजराती. आता पुजारी पण तिथूनच आणतात. भूमिपुत्राला न्याय नाही, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा न्याय मराठी माणसाला मिळाला पाहिजे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com