chhagan bhujbal  saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal News: भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

'भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं.

Vishal Gangurde

Chaagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपूर येथे होत आहे. या शिबिरात छगन भुजबळ यांनी प्रमुख उपस्थिती आहे. या शिबिरात भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या समस्येवर भाष्य केलं. तसेच भुजबळ यांनी पक्ष संघटनेवरही मोठं भाष्य केलं. 'भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या शिबीरात छगन भुजबळ म्हणाले, 'ओबीसी समाजासाठी खूप काम करण्याची गरज आहे. ओबीसी समाजासाठी शिवसेना सोडली. शरद पवार हे ओबीसींसाठी काम करत होते. ओबीसींसाठी फडणवीसांनी कायदा बनवला, पण फार टिकला नाही. एसीमध्ये बसून त्यांच्या लोकांनी इम्पेरिकल डेटा बनवला. त्याचा उपयोग झाला नाही'.

'ओबीसी समाजाची जनगणना झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. एससी-एसटी समाजाला निधी मिळतो, त्यानुसार ओबीसी समाजाला देखील मिळाला पाहिजे,अशी मागणी भुजबळ यांनी केली.

भुजबळ पुढे म्हणाले, 'ओबीसी सेल आणि राष्ट्रवादीचं काम नुसतं भाषण करून होणार नाही. तुम्हाला काम करावं लागणार , रस्त्यावर उतरावं लागणार आहे. ओबीसी सेलमध्ये ईश्वर बालबुद्धे यांनी चांगलं काम केलं. मात्र भाकरी फिरवण्यासाठी अध्यक्ष पदावर दुसऱ्या व्यक्तीला नेमले. मात्र भाकरी फिरवत असतानाती कच्ची राहू नये हे बघितलं पाहिजे, नाहीतर ती खाता येत नाही'.

' पवार साहेबांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केलं. शाहू ,फुले आंबेडकरांचा वारसा घेतला, हे इतर पक्षात नाही. बाकी पक्षात फक्त नावाला ओबीसी सांगतात. मात्र, करणी वेगळी असते, असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT