Congress Leader Chandrakant Handore  Saam TV
मुंबई/पुणे

'त्या' आमदारांवर कारवाई झाली नाही तर पक्षाबाबतचा निर्णय घेऊ; चंद्रकांत हंडोरेंचा काँग्रेसला इशारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे आज चेंबूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे.

जयश्री मोरे

मुबंई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचे आज चेंबूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेची चेंबूर (Chembur) येथे चिंतन शिबिर सुरू आहे. या वेळी बोलताना हंडोरे यांनी काँग्रेस पक्षाबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे.

क्रॉस वोटिंग करणाऱ्यावर कारवाई झाली नाही तर पक्षाबाबतचा निर्णय घेऊ असा इशारा हंडोरे यांनी यावेळी बोलताना पक्षाला दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council) चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, तर भाई जगताप (Bhai Jagtap) विजयी झाले होते.

महाविकास आघाडीकडे मतं असून हा काँग्रेसचा (Congress) उमेदवार पराभूत झाला होता. या उलट भाजपकडे एकही मतं शिल्लक नसताना त्यांचे प्रसाद लाड हे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आता चंद्रकात हंडोरे यांनी आपल्या पराभव झाली याबाबतची खदखद व्यक्त केली आहे.

मतदान करताना ज्यांनी आपणाला डावललं त्यांच्यावर पक्षांने कारवाई करावी अन्यथा पक्षाबबात विचार केला जाईल असा इशारा हंडोरे यांनी आजच्या शक्ती प्रदर्शना दरम्यान दिला आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडीवर कार्यकर्त्यांच्या उपस्थिती हे चिंतन शिबिर होत असून, विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत होता.

पाहा व्हिडीओ -

त्या पार्श्वभूमीवर आजच्या या चिंतन बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.आपण आणि आपले कार्यकर्ते ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर नाराज आहोत, जर फुटीर वादांवर कारवाई झाली नाही तर पक्षाबाबतचा निर्णय घेऊ असे या वेळी हंडोरे म्हणाले.

Edited By - Jagdsih Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT