जम्मू: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी रविवारी कारगिल विजय दिवसानिमित्त जम्मूमध्ये शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. गुलशन मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. पाकव्याप्त काश्मीर (Kashmir) हा भारताचाच भाग होता, आहे आणि राहील असा सज्जड दम संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. (Rajnath Singh Latest News)
हे देखील पाहा -
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, १९६२ च्या युद्धाचा फटका भारताला बसला होता हे निश्चित आहे. चीनने लडाखमधील आमचा भूभाग बळकावला. त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू होते. मात्र, आजचा भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताच्या संसदेत पाकव्याप्त काश्मीरवर ठराव मंजूर करण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचा एक भाग होता, आहे आणि राहील. हे कसे असू शकते की शिवाच्या रूपात बाबा अमरनाथ आपल्यासोबत आहेत आणि आई शारदा शक्ती स्वरूप नियंत्रण रेषेच्या पलीकडे (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) आहे.
यावेळी संरक्षण मंत्री म्हणाले की, अनेक लोक पंडित नेहरूंवर टीका करतात. मी एका विशिष्ट राजकीय पक्षातून आलो आहे. पण मी पंडित नेहरू किंवा कोणत्याही भारतीय पंतप्रधानावर टीका करू शकत नाही. मी भारतीय पंतप्रधानांच्या हेतूंना चुकीचं ठरवू शकत नाही. त्यांचे धोरण चुकले असेल, पण त्याचा हेतू तसा नव्हता असं वक्तव्य त्यांनी भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंबाबत केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.