Chakan Horror: A 30-year-old woman kidnapped and raped by notorious criminal Ganesh Nanekar and his gang in Pune. The woman had earlier filed a complaint against the accused. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : चाकण हादरलं! ७ जणांनी महिलेला किडनॅप केलं, खोलीत डांबून बलात्कार केला

PUNE CRIME SHOCKER: पुण्यातील चाकण परिसरात एका ३० वर्षीय महिलेचं अपहरण करून सात जणांनी मिळून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य आरोपी गणेश नानेकरविरोधात यापूर्वी तक्रार दाखल केली होती.

Namdeo Kumbhar

Chakan Pune woman kidnapped seven men and raped : एका महिलेचं अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या चाकण परिसरातून समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ५ ते ७ जून दरम्यान ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सात जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकावर बलात्काराचा आरोप आहे. मुख्य आरोपीने हे कृत्य जुन्या रागातून केल्याचा संशय पोलिसांना आहे. महिलेने मुख्य आरोपीच्या विरोधात याआधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यामुळे संतापलेल्या आरोपीने मित्रांच्या मदतीने तिचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेने याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश नानेकर, बारकू गोसावी, सुभाष सुतार, प्रज्वल जाधव आणि यश शिंदे यांना अटक केली आहे. तर ओम नानेकर आणि रणजित येरकर हे फरार आहेत. मुख्य आरोपी गणेश नानेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध राज्यभरात १४ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पीडितेने नानेकरविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने नानेकरने तिला चाकूच्या धाकाने अपहरण केले आणि साथीदारांच्या मदतीने गोसावीच्या घरी नेले. तिथे तिला खोलीत डांबून मुख्य आरोपीने चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

महिला आरोपींच्या तावडीतून निसटून पोलिसांपर्यंत पोहोचली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शिवाजी पवार यांनी दिली. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच महिलेने गणेश नानेकरविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, पुराव्याअभावी आणि अन्य कारणांमुळे ते प्रकरण बंद झाल्याची माहितीही समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT