वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चिमुकल्यावर काळाचा घाला, बादलीत बुडून दुर्देवी अंत, आईने फोडला हंबरडा

Jalna News : जालना जिल्ह्यातील सिरसवाडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक वर्षाचा शिव अनिल ढगे हा चिमुकला अंगणात खेळताना पाण्याच्या बादलीत पडून मृत्यूमुखी पडला. ही घटना त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Jalna News
Jalna: Tragic end to a toddler's life as one-year-old Shiv Dhage drowns in a water bucket in Sirsawadi village—just a day before his birthday.Saam TV News
Published On

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

1-year-old child dies after falling into water bucket in Jalna : अंगणात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला आहे. जालन्यातील सिरसवाडी गावात काल हि घटना घडली आहे.शिव अनिल ढगे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच या चिमुकल्यावर काळाने घाला घातलाय.यामुळ सिरसवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.काल सकाळी शिव याला त्याच्या आईने अंगणात खेळण्यासाठी सोडल होत. नेहमीप्रमाणे बाळ अंगणात खेळत असल्याने सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त होते.चिमुकला शिव बादलीतील पाणीसोबत खेळत असताना त्याचा तोल जाऊन तो बादलीतील पाण्यात पडल्याने या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेमुळे सिरसवाडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच चिमुकल्यावर काळाचा घाला

जालन्यातील सिरसवाडी गावात अंगणात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला आहे.शिव अनिल ढगे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच या चिमुकल्यावर काळाने घाला घातलाय. त्यामुळे सिरसवाडी गावाचा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे...

Jalna News
Pune-Solapur Highway : ट्रॅफिकची कटकट दूर होणार; हडपसरमधून झटक्यात पुण्याच्या बाहेर पडणार, यवतपर्यंत नवा उड्डाणपूल

पाण्याच्या बादलीत बुडून दुर्दैवी अंत, आईने फोडला हंबरडा

सिरसवडी येथील अनिल ढगे परिवारासह गावात राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी उठून कामाला जाण्यासाठी आवराआवर सुरू होती. त्या चिमुकल्याची आई योगिता ढगे या बाळाला अंगणात सोडून अंघोळीसाठी गेल्या होत्या. घरातील सगळे आपआपल्या कामात गुंतले होते. अंगणात पाणी भरुन ठेवलेली बादली होती. चिमुकला चालत चालत त्या बादलीकडे गेला. पाणी खेळता खेळता त्याचा तोल जावून तो बादलीत बुडाला. ही घटना त्याच्या मोठ्या भावाच्या लक्षात आल्याने त्याने आईला सांगितली. आई, आपले बाळ बोलत नाही, असे सांगण्यात त्याच्या आईने जावून पाहिले असता बाळ बादलीत बुडालेल्या अवस्थेत दिसून आले. त्याला पाण्याबाहेर काढेपर्यंत त्याचा जीव गेला होता. आईने एकच हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेने सिरसवाडी गावात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

Jalna News
Delhi Fire : इमारतीला भीषण आग, सातव्या मजल्यावरून २ मुलांसोबत बापाने टाकली उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com