मुंबई/पुणे

Central Railway Mega Block : गर्दी, धक्काबुक्की आणि मेगाब्लॉकचा परिणाम; ५ तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, आता परिस्थिती काय?

Central Railway News : मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेवरील हा मेगाब्लॉक तब्बल ५ तासांनी संपला. रविवारच्या मेगाब्लॉकचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.

Saam Tv

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेदरम्यान असलेल्या कर्नाक ब्रीज गर्डरचं लॉन्चिंगमुळे मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी साडे पाच वाजता संपणारा हा ब्लॉक हा सव्वा दहा वाजता संपला. या गर्डर लॉन्चिंगचं काम तब्बल ५ तास उशिराने संपलं. तब्बल ५ तास उशिराने संपल्याने याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला. ५ तासानंतर मध्य रेल्वेची ही वाहतूक सुरु झाली. या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम रेल्वे सेवेर पाहायला मिळाला.

मुंबईतील कर्नाक ब्रीज गर्डर लॉन्चिंगचे काम तब्बल 5 तास उशिराने संपलं. या रेल्वे वाहतुकीचा फटका मध्य रेल्वेला बसला. पाच तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक झाली सुरू आहे. आज रविवारी सकाळी साडे पाच वाजता संपणारा ब्लॉक हा सव्वा दहा वाजता संपला. ब्रीजचा गर्डर बसवताना एक जॅक तुटला. त्यावेळी एका कामगाराला देखील दुखापत झाली. त्यामुळे काम बंद करावे लागले. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल केवळ भायखळ, दादर आणि कुर्ला स्थानकात थांबवण्यात येत होत्या. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा प्रवाशांना मोठा फटका बसला. या मेगाब्लॉकमुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तर काही ट्रेनमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. अखेर पाच तासांनंतर लोकल वाहतूक सीएसएमटीपर्यंत सुरु करण्यात आली आहे.

कर्नाक ब्रीज गर्डरचं काम अर्धवट असल्याने मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून एका क्रेनद्वारे गर्डर सुरक्षित ठेवण्यात आला. तरी देखील पुलाखाली ३० किमी प्रति तासाची वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. मेगाब्लॉकचा परिणाम हा केवळ लोकल वाहतुकीवर नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील झाल्याचं पाहायला मिळालं. मेगाब्लॉकदरम्यान ११ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. ब्लॉक अचानक वाढल्याने आणखी १३ मेल एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलण्यात आलं.

मेगाब्लॉकमुळे १७ मेल एक्स्प्रेस कल्याण, पनवेल, दादर स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. तर १२ गाड्या दादर , एलटीटी, पनवेल, नाशिकवरून सोडण्यात आल्या. यासोबत 4 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

गर्डर लॉन्चिंगवेळी नेमकं काय चुकले?

गर्डर लॉन्चिंग करण्याच्या कामाला उशीर झाल्याने यासंदर्भात मुंबई महापालिकेला विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील मुंबईकरांना माहिती देण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT