Yoga Poses To Stay Cool In Summer: उन्हाळ्यात दररोज सकाळी करा ही 5 योगासने, संपूर्ण दिवस शरीर राहील थंड

Manasvi Choudhary

डिहायड्रेशन त्रास

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने थकवा, चिडचिड आणि डिहायड्रेशनचा त्रास होतो. शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी योगासने करा.

Dehydration

योगा

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराला थकवा जाणवतो. अशा वेळी केवळ पाणी पिऊन किंवा थंड पदार्थ खाऊन भागत नाही, तर शरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी योगा करणे महत्वाचे आहे.

Yoga

बद्ध कोणासन

बद्ध कोणासन जमिनीवर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडा आणि फुलपाखरासारखे पाय हलवा. यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि उष्णतेमुळे येणारी चिडचिड कमी होते.

Yoga Poses To Stay Cool In Summer

चंद्रभेदन प्राणायाम

आपल्या डाव्या नाकपुडीला 'चंद्र नाडी' म्हणतात, जी थंडाव्याचे प्रतीक आहे. उजवी नाकपुडी बंद करा आणि फक्त डाव्या नाकपुडीने खोल श्वास घ्या. त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा

Yoga Poses To Stay Cool In Summer

शितली प्राणायम योगा

शितली प्राणायम योगामध्ये जीभ बाहेर काढून नळीसारखी गोल करा. या नळीतून हळूवार श्वास आत घ्या. श्वास घेताना जिभेला थंडावा जाणवेल

Yoga Poses To Stay Cool In Summer

शवासन

उन्हाळ्यात शरीर लवकर थकते, अशा वेळी जमिनीवर पाठीवर उताणे झोपा. दोन्ही हात आणि पाय सैल सोडा. डोळे मिटून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित होते

Yoga Poses

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे, अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Homemade Skin Tan Removal Tips: उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? पार्लरला जाण्यापूर्वी 'हे' ५ घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

येथे क्लिक करा...