

एका माकडामुळं पायाला डाक्टरची पट्टी बांधलेलं ही हाईत सदानंद खराटे. यांच्या पायला बसलाय जनावरांना बेशुद्ध करणारा डार्ट.नेमकं घडलं कसं तर ती अस्सस. एका पिसाळलेल्या माकडानं. यवतमाळमधल्या भवानी गावच्या नागरिकांच्या झोपाच उडवल्या. या घरावरनं त्या घरावर अन् त्या घरावरनं या घरावर नुसत्या उड्या. कधी म्हाताऱ्यांवर हल्ला तर कधी लहान लेकरांना चावा. पिसाळलेल्या माकडंना नुसता उत आणला.
अखेर गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना बोलावलं अन् वन अधिकारीबी तकडाफडकी बंदूक घेवून हजर. तासाभराच्या झांगडगुत्यानंतर माकड दिसलं. अधिकार्यानं भरला डार्ट. अन् धरला नेमं. एका जागी बसल ती माकड कसलं. टायमावर माकडानं हाणली उडी अन् अधिकाऱ्याचा चुकला नेम. थेट डार्ट बसला सदानंद खराटेला. जागेवर टांगा पलटी.ऐका सदानंद खराटे काय म्हणत्यात .
माकड शेवटी जंगलातला प्राणी त्याला एक कळत नाय. पण माणसाला तर कळतंय. कशाला जायचा वन खात्याचा उद्योग बघायला. झाला का नाय डोक्याला ताप..असो सरकारी माणसाला सरकारी सरकारी काम करु द्या आपण आपला उद्योग सांभाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.