Central Railway Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ३० तासांचा जम्बो ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द अन् लोकलवरही परिणाम

Central Railway Megablock: मध्य रेल्वे मार्गावर तब्बल ३० तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकचा परिणाम लोकलसेवेवर देखील होणार आहे.

Priya More

Summary -

  • मध्य रेल्वेचा ३० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार

  • ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे

  • कर्जत–नेरळ आणि कर्जत–खोपोली लोकल सेवा रद्द

  • मुंबई–पुणे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

  • प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर तब्बल ३० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त तयारी करणाऱ्या मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकलसेवा बंद राहणार आहेत. तसंच मुंबई-पुणे ट्रेन आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत यार्ड पुनर्रचना कामासाठी ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या चार दिवसाच्या कालावधीत मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट आणि डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. मुंबई- पुणे या मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह वंदे भारत एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

पळसधरी ते चौक विभागात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांवर परिणाम होणार आहे. नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. कर्जत, खोपोली, नेरळ, बदलापूर आणि अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशन करण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे. काही एक्सप्रेस गाड्या कल्याणमार्गे आणि काही दौंडमार्गे वळविण्यात येणार आहे.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे वेळापत्रक तपासावे त्यानंतरच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी देखभाल आवश्यक आहे आणि प्रवाशांची गैरसोय झाल्यास रेल्वे प्रशासन दिलगीर असेल असे देखील रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या या मेगाब्ललॉकमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल. परिणामी त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Singer Died: प्रसिद्ध गायकाचे ३५ व्या वर्षी निधन, संगीत विश्वावर शोककळा

Skin Care Tips: ग्लोइंग स्कीनसाठी 'हे' ज्यूस ठरतील फायदेशीर, चेहऱ्यावर त्वरीत दिसेल फरक

रस्त्यावर वाढदिवस, हातात तलवार...थेट कायद्याला आव्हान|VIDEO

Flight Ticket: महागाईचा पहिला फटाका फुटला; ऐन दिवाळीत विमान तिकीट महागलं; वाचा कितीने वाढलं भाडं?

SCROLL FOR NEXT