Mumbai Local  Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलखाली २ म्हशी आल्या; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतवरून मुंबईकडे निघालेल्या लोकलखाली २ म्हशी आल्या. त्यामुळे ही लोकल १ तासापासून एकाच ठिकाणी थांबली आहे. या घटनेमुळे लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

Priya More

Summary -

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  • वांगणीजवळ लोकलखाली २ म्हशी आडकल्या.

  • वांगणी-बदलापूर दरम्यान मुंबईकडे येणारी लोकल थांबली.

  • गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांगणी-बदलापूर दरम्यान लोकलखाली दोन म्हशी अडकल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेला येणाऱ्या अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्जतहुन मुंबईकडे निघालेल्या लोकलखाली या म्हशी आल्या. त्यामुळे ही लोकल तासाभरापासून एकाच ठिकाणी थांबली आहे. लोकल खाली अडकलेल्या दोन्ही म्हशींना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांगणी- बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली दोन म्हशी आल्या. या म्हशी लोकलखाली अडकल्या आहेत. त्यामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानची अप दिशेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईकडे जाणारी लोकल वांगणी -बदलापूर दरम्यान गोरेगाव येथे खोळंबली आहे. ११ वाजून ७ मिनिटांनी ही लोकल वांगणीहूनन मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या या लोकलच्या खाली दोन म्हशी आल्या. काही म्हशी रेल्वे ट्रॅकवरून जात होत्या. त्याचवेळी समोर लोकल आली आणि यामधील दोन म्हशी लोकल खाली सापडल्या. त्यामुळे लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सध्या या म्हशी बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळावर म्हशी बाहेर काढण्याचे काम करत आहेत. या अपघातामध्ये दोन्ही म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतवरून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेला कामासाठी निघालेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईच्या दिशेला येणारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांना आज ऑफिसमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT