
मुंबई लोकलमध्ये बंगाली बाबांच्या जाहिरातींचा सुळसुळाट
नोकरी, लग्न, आजार, ट्रेन वेळेवर येण्यासाठीही हे बाबा उपाय सांगतात.
साम टीव्हीच्या रिपोर्टमधून या भोंदू बाबांचा पर्दाफाश
मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये तुम्ही बसलात की तुम्हाला ‘लग्न जमत नाही? नोकरी लागत नाही? प्रेमभंग झाला का?’ अशा तुमच्या अनेक अडचणींवर तात्काळ तोडगा देण्याचं आश्वासन देणाऱ्या जाहिराती दिसत असतात. आम्ही अशाच एका जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क केला. हा फोन थेट उचलला तो अजमेरच्या एका बाबाने.
लोकल उशिरा येते असल्यानं लेटमार्क लागतो अशी समस्या सांगितल्यावर या बाबानं जे रेल्वे प्रशासनाला कधी जमलं नाही ते करुन दाखवण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पुजेसाठी 1600 रुपये पाठवा असं सांगायला तो विसरला नाही..नेमका काय संवाद झाला ते पाहा.
स्कॅन कोड पाठवून या बाबानं सामटीव्हीकडे पैशाची मागणी तर केलीच वर तुमची समस्या पूर्ण झाली म्हणजे आम्ही पूजा केली असंही सांगितलं. लोकलच्या डब्यात अनेक बोगस जाहिराती खुलेआम चिकटवल्या जातात. त्यावर कुणाचाच अंकुश नसतो आणि परिणामी अनेक गरजुंची आर्थिक फसवणूक होत असते. म्हणूनच साम टीव्हीने रेल्वे प्रशासनाला जाऊन याची तक्रार केली असता प्रशासनानं मात्र आपली जबाबदारी झटकली.
धन प्राप्ती, पुत्र प्राप्तीपासून ते अगदी कोर्टकचेरी, कौटुंबिक कलहातून तुम्हाला 100 टक्के सोडवण्याचा दावा या जाहीरातींमधून केला जातोय. प्रतिकूल परिस्थितीने निराश झालेले अनेक प्रवासी बंगाली बाबांच्या सापळ्यात फसत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे अशा जाहीराती रेल्वेत लागणारच नाहीत यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. नाहीतर समस्यांवरील उपायांच्या मोहापायी प्रवाशांचा लुबाडणूक सुरूच राहील. आणि समस्या जैसे थेच राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.