Mumbai Local Disrupted  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वे खोळंबली! बदलापुरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी रूळावरून चालत निघाले; पाहा VIDEO

Central Railway Disrupted: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली. प्रवासी रेल्वे रूळावरून चालत निघाले.

Priya More

Summary -

  • बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकलसेवा ठप्प झाली.

  • ट्रेन थांबल्याने प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालत पुढे जाणे सुरू केले.

  • सीएसएमटी आणि कर्जत-खोपोलीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.

  • रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. मालगाडी एकाच जागी थांबल्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली आहे. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या आहेत. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे रूळावरून चालत निघाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्ये रेल्वेच्या बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. मालगाडी एकाच ठिकाणी थांबल्यामुळे लोकलसेवा ठप्प झाली. सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा ठप्प झाली. तर कल्याणवरून कर्जत-खोपोलीकडे जाणारी लोकलसेवा देखील विस्कळीत झाली आहे.

लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर मालगाडीच्या मागे अडकलेल्या सर्व लोकलमधील प्रवासी खाली उतरून ते रुळावरून चालत निघाले आहेत. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काहींना कामाला जाण्यासाठी तर काहींना घरी जाण्यासाठी उशिर होत आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये दुरूस्ती होऊन ती पुढे गेल्याशिवाय लोकलसेवा सुरळीत होणार नाही. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT