mega block  Saam tv
मुंबई/पुणे

विकेंडला प्रवाशांचे हाल होणार; मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

mega block sunday : विकेंडला प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केलीये.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेची रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची घोषणा

ठाणे–कल्याण दरम्यान मार्गावर सकाळी १०.४० ते ३.४० ब्लॉक

लोकल सेवा धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत

मध्य रेल्वेने मुंबई विभागात रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर या मेगाब्लॉक असणार आहे.

मुख्य मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर १०.४० ते १५.४० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.३४ ते १५.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्ध-जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेन कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. कल्याण येथून १०.२८ ते १५.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/ अर्ध-जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील.

तर पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेन १० मिनिटे उशिराने स्टेशनला पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/ एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान ५व्या मार्गावरून वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर कसं असेल वेळापत्रक?

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी १५.३६ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेल कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून १०.१७ ते १५.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला तसेच पनवेल – वाशी विभागात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत १०.०० ते १८.०० या वेळेत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT