central railway mega block Saam tv
मुंबई/पुणे

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

central railway power block : मध्य रेल्वेने विशेष मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेकडून पॉवर ब्लॉकची घोषणा

पनवेल–कळंबोलीदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

लांबपल्ल्यांच्या मार्गात बदल

मध्य रेल्वेने विशेष पॉवरब्लॉकची घोषणा केली आहे.डीएफसीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने कळंबोली येथे ओपन वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल–कळंबोलीदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्सची घोषणा करण्यात आली आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन) ओपन वेब गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून पनवेल–कळंबोली दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स असणार आहे.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर काय परिणाम होणार?

१) दिनांक : १८/१९.०१.२०२६ (रविवार/सोमवार मध्यरात्री)

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०१.२० ते ०३.२० वाजेपर्यंत (२ तास)

परिणाम :

दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस कर्जत–कल्याण–वसई रोड मार्गे वळविण्यात येईल.

मंगलूरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पनवेल येथे ०३.१४ ते ०३.२० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

२) दिनांक : २५/२६.०१.२०२६ (रविवार/सोमवार मध्यरात्री)

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०१.२० ते ०५.२० वाजेपर्यंत (४ तास)

परिणाम :

दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस कर्जत–कल्याण–वसई रोड मार्गे वळविण्यात येईल.

मंगलूरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सोमटणे

स्थानकावर ०२.५८ ते ०५.२० या कालावधीत रेग्युलेट करण्यात येईल.

मडगाव जं. – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल येथे ०४.०२ ते ०५.२० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस आपटा स्थानकावर ०४.२५ ते ०५.१५ वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

मंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मत्स्यगंधा एक्सप्रेस जिते स्थानकावर ०४.४१ ते ०५.१० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव मांडवी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.२० वाजता पुनर्निर्धारित करण्यात येईल.

हुबळी - दादर एक्सप्रेस विभागातील गाड्या थांबवल्यामुळे १५ ते २० मिनिटे उशिरा धावेल.

दिनांक : ०३/०४.०२.२०२६ (मंगळवार/बुधवार मध्यरात्र)

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०१.२० ते ०४.२० वाजेपर्यंत (३ तास)

परिणाम :

मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सोमटणे स्थानकावर ०२.५८ ते ०४.१० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

मडगाव जं. – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल येथे ०४.०२ ते ०४.२० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

४) दिनांक : १०/११.०२.२०२६ (मंगळवार/बुधवार मध्यरात्र)

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०१.२० ते ०३.२० वाजेपर्यंत (२ तास)

परिणाम :

मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पनवेल येथे ०३.१४ ते ०३.२० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

५) दिनांक : १२/१३.०२.२०२६ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री)*

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०२.०० ते ०४.०० वाजेपर्यंत (२ तास)

परिणाम :

तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस पनवेल येथे ०२.२५ ते ०४.०० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सोमटणे स्थानकावर ०२.५८ ते ०४.०० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

दिनांक : १४/१५.०२.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्र)

विभाग : कळंबोली–पनवेल

कालावधी : ०२.०० ते ०४.०० वाजेपर्यंत (२ तास)

परिणाम :

तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस पनवेल येथे ०२.५० ते ०४.०० वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस सोमटणे स्थानकावर ०२.५८ ते ०३.५५ वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT