Sunday 5th april Train Megablock Update News  Saam Tv
मुंबई/पुणे

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Sunday Megablock Schedule News : मध्य रेल्वेने ५ एप्रिल रोजी हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या दरम्यान अनेक लोकल गाड्या रद्द राहणार असून प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

Alisha Khedekar

  • ५ एप्रिल रोजी हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

  • पनवेल-वाशी दरम्यान अनेक गाड्या रद्द

  • देखभाल कामांसाठी रेल्वेचा निर्णय

  • प्रवाशांना पर्यायी सेवांचा वापर करण्याचा सल्ला

प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी रविवार ५ एप्रिल रोजी आपल्या उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक जारी करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. यामुळे येत्या रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी पुढील वेळापत्रक वाचा.

मध्य रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत अप व डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान पनवेल येथून सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या 'अप' हार्बर मार्ग सेवा, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ या वेळेत पनवेल-बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्ग सेवा रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ या वेळेत पनवेल येथून सुटते आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणारी 'डाऊन' ट्रान्स-हार्बर मार्ग सेवा जी सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० या वेळेत ठाण्याहून सुटते, या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागावर विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे 'मेगा ब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

Maharashtra Live News Update : लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

Crime: गॅस सिलिंडरवरून कडाक्याचे भांडण, नवऱ्याने ९ महिन्यांच्या गरोदर बायकोची केली हत्या

रील बनवणं पडलं महागात; ४ मित्रांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT