Siddhi Hande
छोले भटुरे हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. ही उत्तर भारतीय डीश आहे परंतु संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
छोले भटुरे खूप चविष्ट लागतात. तुम्ही घरी झटपट ही रेसिपी बनवू शकतात.
मैदा, रवा, दही, तेल, मीठ, सोडा, साखर, पाणी, भिजवलेले काबुली चणे, कांदा, टॉमेटो, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, गरम मसाला, तेल, चिंचेचा गोळ
सर्वात आधी तुम्हाला भटुरे बनवायचे आहे. त्यासाठी एका परातीत मैदा, रवा, मीठ, खायचा सोडा एकत्र करा.
यामध्ये दही आणि १ चमचा तेल टाका.त्यानंतर थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. हे पीठ १-२ तास कपड्याने झाकून ठेवा.
छोले बनवण्यासाठी सर्वात आधी भिजवलेले छोले, पाणी, खडा मसाला, मीठ कुकरमध्ये टाकून शिट्ट्या घ्या.
कढईत तेल गरम करा, त्यात जिरे टाका. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट आणि टॉमेटो टाकून शिजवून घ्या.
यामध्ये लाल तिखट, हळद, छोले मसाला,धनेपूड टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शिजलेले छोले टाका. त्यावर मीठ टाका. १०-२० मिनिटे शिजवून घ्या.
यानंतर भटूरे बनवण्यासाठी पीठाचे गोळे करुन लाटून घ्या.
एकीकडे तेल कडकडीत गरम करा. त्यात भटूरे सोडून हलके दाबा. जेणेकरुन टम्म फुगतील. दोन्ही बाजूंनी भटुरे छान तळून घ्या.