Shruti Vilas Kadam
पनीर क्यूब्स, दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, क्रीम, कांदा, टोमॅटो आणि बटर आवश्यक आहे.
दही, मसाले आणि आले-लसूण पेस्टमध्ये पनीर ३० मिनिटे मॅरिनेट करून ठेवा, त्यामुळे चव छान लागते.
मॅरिनेट केलेले पनीर तव्यावर किंवा ओव्हनमध्ये हलके भाजून घ्या, जेणेकरून स्मोकी फ्लेवर येतो.
कांदा आणि टोमॅटो परतून त्याची पेस्ट तयार करा. त्यात मसाले घालून छान शिजवा.
ग्रेव्हीमध्ये क्रीम आणि बटर घालून रिच टेक्स्चर मिळवा, त्यामुळे चव अधिक स्वादिष्ट होते.
भाजलेले पनीर ग्रेव्हीत घालून ५-७ मिनिटे शिजवा, जेणेकरून मसाले चांगले मुरतात.
कोथिंबीर आणि क्रीमने सजवून गरमागरम पनीर टिक्का मसाला रोटी किंवा नानसोबत सर्व्ह करा.