Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Premanand Maharaj Health Update : प्रेमानंद महाराजांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे वृंदावनमधील पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती देण्यात येत असून, भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
PREMANAND MAHARAJ HEALTH UPDATE: VRINDAVAN PADYATRA CANCELLED, DEVOTEES CONCERNED
PREMANAND MAHARAJ HEALTH UPDATE: VRINDAVAN PADYATRA CANCELLED, DEVOTEES CONCERNEDSaam Tv
Published On
Summary
  • प्रेमानंद महाराजांची प्रकृती अचानक खालावली

  • वृंदावनमधील पदयात्रा रद्द करण्यात आली

  • भक्तांना दर्शन न घेता परतावे लागले

  • डॉक्टरांनी महाराजांना विश्रांतीचा सल्ला दिला

  • भक्तांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना

क्रिकेट पटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या पोस्टमध्ये आपण नेहमी एका महाराजांना पाहतो. हे महाराज म्हणजे प्रेमानंद महाराज. जगाला प्रेमाचा संदेश देणारे आणि अनेक दिग्गज मंडळींचे गुरु असणाऱ्या प्रेमानंद महाराजांची तब्बेत खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराज गेली अनेक वर्ष किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या पदयात्रा रद्द करण्यात आल्या, तसेच त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांचं दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली. या घोषणेनंतर भक्तांना दर्शन न घेताच परतावे लागले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,प्रेमानंद महाराज दररोज पहाटे ३ वाजता वृंदावनमध्ये पदयात्रा करतात आणि त्यावेळी देशभरातून आलेले भाविक त्यांचे दर्शन घेतात. मात्र रविवारी पहाटे ते पदयात्रेसाठी बाहेर आले नाहीत. त्याऐवजी आश्रमातील शिष्यांनी महाराजांची प्रकृती खालावल्याची माहिती देत पदयात्रा रद्द केल्याची घोषणा केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सध्या पूर्ण विश्रांती देण्यात येत आहे.

PREMANAND MAHARAJ HEALTH UPDATE: VRINDAVAN PADYATRA CANCELLED, DEVOTEES CONCERNED
Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

महाराजांच्या दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच मोठ्या संख्येने भक्त वृंदावनमध्ये दाखल झाले होते. परंतु अचानक झालेल्या या घोषणेमुळे त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले. अनेक भक्त यावेळी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “महाराज लवकर बरे व्हावेत,” अशी प्रार्थना करत भक्तांनी आश्रम परिसरातच देवाला साकडे घातले.

PREMANAND MAHARAJ HEALTH UPDATE: VRINDAVAN PADYATRA CANCELLED, DEVOTEES CONCERNED
Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

प्रेमानंद महाराज केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सोशल मीडियावरही अत्यंत लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर त्यांचे सुमारे ७.६ दशलक्ष, इंस्टाग्रामवर २४ दशलक्ष आणि फेसबुकवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह आशुतोष राणा, हेमा मालिनी, मिका सिंग आणि इतर अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे अनुयायी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महाराजांची पदयात्रा आणि दर्शन पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे देशभरातील त्यांच्या भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराजांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com