Jayant Patil, Supriya Sule , Maharashtra Governor Ramesh Bais Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan : 'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावं', राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलं निवेदन

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावं', राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलं निवेदन

Satish Kengar

Maratha Aarakshan :

मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीसाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. राज्यभरात मराठा समाजकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. याचदरम्यान आज मराठा समाजाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, ''मी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना मराठा आंदोलनाकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलं.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''राज्य सरकारने मनोज जरांगे यांना जे आश्वासन दिले होते, ते एक महिन्याच्या कालावधीसाठी होते, आता जरांगे हे पुन्हा उपोषणावर बसले आहेत. लोक ही त्यांना उपोषण करून पाठिंबा देत आहे. राज्यपालांनी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला तातडीने संपर्क साधला पाहिजे.'' (Latest Marathi News)

जयंत पाटील पुढे म्हणाले की, ''परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्य सरकार यासाठी पावले उचलत नसून आता केंद्राने यात लक्ष घालून मार्ग काढावा. बैठका बऱ्याच झाल्या पुढे ही होत आहेत. पण मार्ग काढला पाहीजे. निर्णयापर्यंत पोहचावे, ही लोकांच्या दृष्टीने चिंचेती बाब आहे.''

शरद पवार काय म्हणाले?

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ''जरांगे पाटील यांची भूमिका ही दुसऱ्यांच्या ताटातून घेण्याची नाही. आज लोक रस्त्यावर येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी.''

राष्ट्रवादीने निवेदनात काय केली मागणी?

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ''महाराष्ट्र राज्यात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर असून मराठा समाजाने महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या जडणघडणीत ऐतिहासीक योगदान दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी होत असून समाज अद्यापही आरक्षणापासून वंचित राहिल्याने मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.''

यात लिहिलं आहे की, ''आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यात महिला, वृद्ध आणि लहान मुले यांच्यावरही लाठीहल्ला, अश्रूधूर आणि गोळीबाराचा वापर करण्यात आला. राज्य सरकारच्या ह्या अमानविय कृतीने मराठा आंदोलनाने राज्यभर उग्र रूप धारण केले आहे. त्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे प्रकार सुरू झाले आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.''

निवेदनात म्हटलं आहे की, ''भारतीय राज्यघटनेनुसार आरक्षणासाठी आवश्यक असणारे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण या दोन्ही निकषास मराठा समाज पात्र ठरतो. मराठा समाजामध्ये भूमिहीन असण्याचे प्रमाण देखील वाढले असून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर पिछाडलेला आहे. देशाच्या इतिहासात अत्यंत मोलाची भुमिका पार पाडणाऱ्या ह्या समाजाची अवस्था बिकट झाली असल्याने ह्या मागासलेपणावर आरक्षण हा एकच पर्याय आहे. यापुर्वी राज्य शासनाने दिलेले आरक्षण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने मराठा समाजास कोणतेही आरक्षण उपलब्ध नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : विजय नक्की आमचा होईल- हेमंत रासनेंच्या पत्नी

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT