Maharashtra Politics: कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या...; कार्यकर्त्यांच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविजय 2024 संकल्प दौरा आज डोंबिवलीत सुरू आहे.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankulesaam tv
Published On

Chandrashekhar Bawankule News:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. 'मी पुन्हा येईल' असं म्हणतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला उधाण आलं होतं. अशात आता खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय.

Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bawankule: खरं तर ती त्यांची पात्रता नाही...; उद्धव ठाकरेंनी PM मोदींवर केलेल्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच असावा अशी मागणी भाजप कार्यकत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलीये.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविजय 2024 संकल्प दौरा आज डोंबिवलीत सुरू आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी मागणी केलीये. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील दावा केलाय.

याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी खरी असल्याचं सांगितलं आहे. भाजप कार्यकर्त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा असं वाटतं, मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील हा मतदारसंघ आपल्याला मिळावा असं वाटत असल्याचं बावनकुळे म्हणाले.

जागावाटपाचा निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहेत. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. कल्याण लोकसभेची जागा शिवसेनेकडे गेली तर 51% मतांनी खासदार निवडून यावा याकरिता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिने तयारी करेल, असं बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bavankule
Maratha Reservation : मराठा बांधवांकडून मंत्री अतुल सावे यांना घेराव, नागरिकांचा संताप पाहून दुचाकीवरून ठोकावी लागली धुम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com