Chandrashekhar Bawankule: खरं तर ती त्यांची पात्रता नाही...; उद्धव ठाकरेंनी PM मोदींवर केलेल्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, saam tv
Published On

Chandrashekhar Bawankule:

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काल दुसऱ्यांदा शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा भव्य दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Pankaja Munde News: पंकजा मुंडे यांची मेळाव्यातील भाषणाआधी मोठी प्रतिक्रिया! म्हणाल्या, मी नव्हर्स

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर (एक्स) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय की, "उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडीया आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत.", असं टीकास्त्र बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर सोडलंय.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्यांवर प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी लिहिलं की, " पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उध्दव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदींचं कुटुंब आहे पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी‘ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही."

माफी मागतील, असं वाटलं होतं पण...

"शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले.कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे.", असा टोला बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
UP Crime News: धक्कादायक! मजुराचा खून करून मृतदेह शेतात पुरला; त्यावर बटाट्याची केली लागवड, पोलीसही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com