CCTV At Liquior Shop Saam Tv
मुंबई/पुणे

CCTV At Liquior Shop: मोठी बातमी! बार आणि पबमध्ये CCTV बंधनकारक; AI कॅमेऱ्याद्वारे ठेवलं जाणार लक्ष

CCTV Now Complusory At Places Serving Liquior: मद्यविक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आता सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही विशेष मोहिम आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सर्वच मद्यविक्री करणाऱ्या दुकांनामध्ये मुख्य काउंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अनिवार्य आहे. मुंबईत नुकतंच झालेलं वरळी हिट-अँड-रन प्रकरण आणि मे महिन्यात पुण्यातील पोर्शेच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केलीय. बार आणि पबमध्ये रेस्टॉरंटमधील मुख्य काउंटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केलंय.

उत्पादन शुल्क अधिकारी बार आणि पबमध्ये होणाऱ्या अनियमिततेवर लक्ष ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांचं नियंत्रण करणार आहेत. यासाठी विभागाने एक पाच सदस्यीय टीम देखील तयार (CCTV At Liquior Shop) केलीय. ही टीम एआयच्या साहाय्याने काम करणार आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे वय त्याच्या चेहऱ्यावरून निर्धारित करण्यासाठी कॅमेरे बसवले जाणार आहेत.

एआय कॅमेरा २१ वर्षांखालील व्यक्तींचा शोध घेईल. त्यानंतर सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचे निरीक्षण करणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला त्यांच्या मोबाईल फोनवर सूचना मिळेल. या सर्व यंत्रणा दुर्घटना टाळतील, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्काच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत आहे. नियमानुसार फक्त २१ वर्षावरील लोकच बारमध्ये प्रवेश करू शकतात. २१ ते २५ मधील लोकांना हार्ड ड्रिंक्स देण्यास मनाई आहे. ते फक्त पाच टक्क्यांपेक्षा कमी अल्कोहोल असणारे बिअर किंवा वाइन घेऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत बार मालक आणि व्यवस्थापकांना सूचना देऊन सतर्क (Liquior) केलं जाईल. अल्पवयीन मुलांना दारू पिण्याची परवानगी देण्यापूर्वी बारमालक दोनदा विचार करतील, कारण त्यांना थेट पुराव्यासह जबाबदार धरलं जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे म्हणाले की, विभाग आता मुंबईतील सुमारे २ हजार बार, रेस्टॉरंट आणि पबमधील कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहे.

पुणे पोर्शे कार अपघातानंतर आम्ही एक विशेष मोहीम सुरू (Mumbai News) केलीय. सर्व बार आणि पबमध्ये परमिट रूम आणि बार काउंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केलेत. या भागात तैनात असलेले उत्पादन शुल्क अधिकारी बार मालकांकडून ईमेल आयडी आणि पासवर्ड घेऊन कॅमेऱ्यांचा अक्सेस मिळवतील, त्यावर लक्ष ठेवतील असं अधिकारी सुर्वे यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT