CCTV Footage : तोल गेला अन् महिला रेल्वे ट्रॅकवर पडली; RPF जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण, थरारक VIDEO

RPF Save Female Passanger Falling From Moving Railway: रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेला आरपीएफच्या जवानानं वाचवलं आहे. नाशिकमधील या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.
महिलेला आरपीएफच्या जवानानं वाचवलं
Nashik NewsSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

राज्यात दररोज हजारो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. अनेकदा रेल्वेत चढताना किंवा उतरताना अपघात घडतात, प्रवासी रेल्वे रूळावर पडत असल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना आता नाशिमधून देखील समोर आलीय. चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिला प्रवाशाचे प्राण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने वाचवलेत. नाशिक रेल्वे स्थानकावरील या घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओ आता समोर आला आहे.

नक्की काय घडलं?

महिला प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने वाचवल्याची घटना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (RPF Save Female Passanger) घडली. ही महिला विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. नाशिक रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरताना या महिलेचा तोल गेला अन् ती थेट खाली कोसळली. या घटनेकडे लक्ष जाताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने वाऱ्याच्या वेगाने घटनास्थळी धाव घेतली अन् महिलेचे प्राण वाचवले. हा सगळा थरार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झालाय.

धावत्या ट्रेनमधून उतरताना महिला कोसळली

विदर्भ एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तोल (Nashik News) गेला. यामुळे महिला प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून ट्रेनखाली जात होती. हे लक्षात येताच प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने आपला जीव धोक्यात घालून महिला प्रवासाचे प्राण वाचवले. चालत्या ट्रेनमधून खाली उतरणं या महिलेच्या जीवावर बेतलं असतं, परंतु रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानामुळे तिचे प्राण वाचले आहेत.

महिलेला आरपीएफच्या जवानानं वाचवलं
CCTV Footage : डोळे पुसले, हातात हात घेतले, रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपले; बाप-लेकाचा शेवटचा VIDEO

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने वाचवले प्राण

स्वस्तात प्रवास म्हणून आपण बऱ्याच वेळा रेल्वे हा पर्याय (Railway Security Force) निवडतो. परंतु रेल्वेने प्रवास करताना काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा दुर्घटना घडू शकते. चालत्या गाडीतून उतरू नका, असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासन प्रवाशांना करते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नेहमीच दुर्घटना घडतात. नाशिकमधील देखील मोठी दुर्घटना आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे टळल्याचं समोर आलंय. आता रेल्वे सुरक्षा (Nashik Railway) बलाच्या जवानाच्या कामगिरीचं मोठं कौतुक होत आहे.

महिलेला आरपीएफच्या जवानानं वाचवलं
Nagpur Accident: नागपूरमध्ये पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं; CCTV व्हिडिओ आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com