Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; अपघात CCTV मध्ये कैद

Pune Accident: पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; येरवड्यातील घटना
Pune Car Accident VideoSaam Tv

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये भरधाव कारने एकाला चिरडल्याची (Pune Car Accident) धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ४१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. येरवडा भागात असणाऱ्या गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. या अपघातानंतर पुणे पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासासाठी त्याला रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून (Pune Police) सुरू आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आलिशान कारखाली चिरडून ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पुण्याच्या येरवडा भागात असणाऱ्या गोल्फ कोर्सजवळ दुपारी हा अपघात झाला. आलिशान कारखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. केदार मोहन चव्हाण (४१ वर्षे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कारचालक नंदू अर्जून ढवळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; येरवड्यातील घटना
Pune Fraud News: साताऱ्याच्या कश्मिरा पवारचा प्रताप! PMO मध्ये सल्लागार असल्याचं सांगून ५० लाखांना गंडवलं, पुण्यात गुन्हा

मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येरवडा भागात असणाऱ्या गोल्फ कोर्स चौकात केदारे चव्हाण त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अचानक रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्याच्या मधोमध पडले. त्याठिकाणावरून जाणाऱ्या आलिशान कारने त्यांना चिरडले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या केदार चव्हाण यांना स्थानिकांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Pune Car Accident Video: पुण्यात चाललंय काय?, भरधाव कारने एकाला चिरडले; येरवड्यातील घटना
Pune News : पुण्यातील ६० ते ७० रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेल प्राप्त होताच पोलिसांची धावपळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com